मैत्री
मैत्री

1 min

69
आजचा दिवस खास
दिलखुलास सतरंगी मैत्रीचा!
होय! मीही मालकच
या बेशुमार दौलतीचा!!
हातात हात, खांद्याला खांदा
हा खेळ अव्यक्त भावनांचा!
ना नियम, ना अटी, ना शर्ती
हा भाव अरक्त नात्याचा!!
कट्ट्यावरची यारीची मैफिल
फड रंगतो गप्पांचा!
“बस क्या भिडू” म्हणत
मीही हकदार त्या “दे रे टाळी”चा!!
एक कप चहाच्या झुरक्यासरशी
मनात खुलतात असंख्य वाटा!
निस्वार्थ अन् निरागसतेच्या घोटातून
फुर्रर्रकन उसळे दोस्तीच्या लाटा!!