STORYMIRROR

Subhash Patil

Others

3  

Subhash Patil

Others

अरक्त

अरक्त

1 min
33

रक्षाबंधनाचा पवित्र दिवस

उद्या पुन्हा तो ऊजाडणार!

जिथे माझ्या काळजाच्या

पुन्हा ठिकऱ्या उडणार!!


बहिणीच्या प्रेमाचं पोरकेपण

पुन्हा एकदा ऊघड्यावर येणार!

काही परंपरा असतातच अशा

रक्ताच्या नात्यानेच साजय्रा होणार!!


भावनांनी जुळलेलं नातं सतत

का? यांना खुपत राहणार!

मनात कितीही पावित्र्य राखलं तरी

त्याकडं संशयानेच बघत राहणार!!


चाली, रिती, रिवाजासाठी

रक्तालाच प्राधान्य मिळत राहणार!

मानलेला असल्याची शिक्षा म्हणून

कामापुरताच वापरात राहणार!!


Rate this content
Log in