तु रागावणार नसशिल तर!!
तु रागावणार नसशिल तर!!


तु रागावणार नसशिल तर
तुला एक सांगायचं होतं!
काल रात्री जे घडलं,
ते मला करायचं नव्हतं!
पण ऊण्मत्तं झालेल्या नयनांना,
आपसुकच प्रेमात अडकवलं होतं!
तु रागावणार नसशिल तर
तुला एक सांगायचं होतं!
चांदण्यांच्या मंद प्रकाशात,
तुला मिठीत घ्यायचं नव्हतं!
माझ्या मिठीतुन सुटायला,
नाहितरी तुलाही कुठे वाटत होतं!
तु रागावणार नसशिल तर
तुला एक सांगायचं होतं!
धडधडणाय्रा दिर्घ ठोक्यांनी,
आसमंत सारा दरवळला होता!
धगधगत्या ऊष्ण श्वासांनी,
वणवा प्रणयाचा पेटला होता!
तु रागावणार नसशिल तर
तुला एक सांगायचं होतं!
तुझ्या सर्वांगाच्या सुगंधानं,
मला मोहुन घेतलं होतं!
माझ्या सर्वांगाच्या स्पर्शानं,
तुलाही जखडुन घेतलं होतं!
तु रागावणार नसशिल तर
तुला एक सांगायचं होतं!
एकमेकांच्या सहवासानं आपल्याला,
परीस्थितीचं भानच उरलं नव्हतं!
स्वर्गसुखाची सैर करून आल्याचं,
प्रेम दोघांनी अनुभवलं होतं!