STORYMIRROR

Subhash Patil

Romance

4  

Subhash Patil

Romance

प्रणयातलं प्रेम

प्रणयातलं प्रेम

1 min
671

तू रागावणार नसशील तर

तुला एक सांगायचं होतं!

काल रात्री जे घडलं,

ते मला करायचं नव्हतं!

पण उन्मत्त झालेल्या नयनांना,

आपसुकच प्रेमात अडकवलं होतं!


तू रागावणार नसशील तर

तुला एक सांगायचं होतं!

चांदण्यांच्या मंद प्रकाशात,

तुला मिठीत घ्यायचं नव्हतं!

माझ्या मिठीतून सुटायला,

नाहीतरी तुलाही कुठे वाटत होतं!


तू रागावणार नसशील तर

तुला एक सांगायचं होतं!

धडधडणाऱ्या दीर्घ ठोक्यांनी,

आसमंत सारा दरवळला होता!

धगधगत्या उष्ण श्वासांनी,

वणवा प्रणयाचा पेटला होता!


तू रागावणार नसशील तर

तुला एक सांगायचं होतं!

तुझ्या सर्वांगाच्या सुगंधानं,

मला मोहुन घेतलं होतं!

माझ्या सर्वांगाच्या स्पर्शानं,

तुलाही जखडून घेतलं होतं!


तू रागावणार नसशील तर

तुला एक सांगायचं होतं!

एकमेकांच्या सहवासानं आपल्याला,

परीस्थितीचं भानच उरलं नव्हतं!

स्वर्गसुखाची सैर करून आल्याचं,

प्रेम दोघांनी अनुभवलं होतं!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance