स्वप्नातलं घर
स्वप्नातलं घर
माझ्या स्वप्नातलं एक कौलारू घर असावं
घरासमोर एक सुंदर अंगण असावं.
घरात खोली मात्र एकचं असावी
जिथे सगळ्या कुटुंबाची गर्दी असावी
सगळेच एकमेकांच्या कामात व्यस्त असल्यागत,
भयाण शांतता जवळपास कुठेच नसावी.
सायंकाळी कसे, जेवताना पंगत असेल
पंगतीत आनंदही आसपास भटकताना दिसेल
भावा भावंडांचा अबोलाही तिथेच सुटेल
एकटाच कुठेतरी आठवणीत रेडिओ लावून बसल्यागत,
वातावरण शांत, जीवघेणं आणि दुःखी कधीच नसेल
गप्पात रंगताना, स्वतःच्या दुःखाची विसर पडावी,
वडील धाऱ्याना उलट बोलल्याची चूक नडावी,
चुकल्यास घरात कोणीतरी बोलणारा असेल,
मनवेल मला कोणी तरी जेंव्हा मी रुसेल
आताच्यासारखं नाही,
संकटात सुद्धा मीच मला सांभाळत असेल
अंगणात मात्र एक छोतंसं झाड असावं
ज्याच्याशी मी सगळं माझं गुज बोलावं
ज्याच्याखाली भर उन्हात आडोसा घेता येईल
जिथे पिढ्यानपिढ्या आठवणींना उजाळा देता येईल
जे माझ्या पूर्वजांच्या गोष्टी मला सांगावं
माझ्या स्वप्नातलं एक कौलारू घर असावं
माझ्या स्वप्नातलं एक कौलारू घर असावं
