STORYMIRROR

Dipti Hatwar

Fantasy

3  

Dipti Hatwar

Fantasy

स्वप्न

स्वप्न

1 min
208

मर्यादेचं माहीत नाही

पण चौखट माहीत आहे मला माझी

म्हणून चंद्राचं स्वप्न मी उशाला ठेवते

आणि अवसे सारखी रात्र जगते


उभ्या आयुष्यात चंद्राचं स्वप्न

मला कधी पडलं नव्हतं

त्याचं असण्यानी माझं कधी काही अडलं नव्हतं

पण त्याचं अस्तित्व जाणवलं तेव्हा

ते घडलं जे कधी घडलं नव्हतं


मग

काही उसासे अबोल ठेऊन

स्वाभिमानाच्या चार भिंती

मी पण बांधल्या 

माझ्याच अवती भवती

चंद्रा तुझं असणं नसणं

सारखच रे आता


 भावनेची भरती ओहोटी असेल नक्कीच

पण भावनांना उधाण आलं ना

तर

मी कूस बदलून घेईल हळूच

पण

तू कायम असशील उश्याशीच


एक सांगू

तुला बघणं पण सोडलय मी आता

अभिमान स्वाभिमानाचा खेळ

आपण दोघे खेळतोय आता

तू खंबिर रहा आहे तसा

अधरात अबोला बांधू आता


आपल्याच आभासी जगात वावर तूझा

आभासी जग तुझं आवर आता

कधी तरी जमीनीवर येऊन बघ

एकदा स्वताचच प्रतिबिंब माझ्या डोळ्यात बघ


तुझ्याच सौदर्याची तुला ओळख पटेल

काहीच नसूनही आपल्यात 

 तू आजही उश्याशी का आहे

तुझं तुलाच कळेल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy