वारांगना
वारांगना
वारांगना म्हणून का हिणविता मज
नातं तुझं आणि माझं
जसं नातं रात्रं आणि दिवसाचं
दिवसासाठी रात्र मालवते
आणि रात्री साठी दिवस
तू नाकारत नाहीच कधी माझं अस्तित्व
पण स्विकारतही नाहीस ना?
ओंजळभर प्रकाश लेऊन मग संध्याकाळ होऊन भेटतो रात्रीला
अगदी क्षितिजा सारख.....
क्षणभंगुर ........
निरस वाटतं तुला मावळतांना बघून
पण आयुष्याचा लपंडाव ना हा.....
मना सोबत मेंदू पण फरफटत जातोय आता
सवय झाली आहे तुझ्या असूनही नसण्याची
तसा तुझ्या आठवणीचा मुठभर प्रकाश
जपलाय मी
रात्र जास्त काळी झाली की
आशेचं इंधन घालून तो प्रकाश मग तेवत ठेवते
संथ दिप्ती मग सोबत करते माझी
उब मग तुझ्या मायेची संचारते माझ्यात
आणि मग तुझ्या येण्याची वाट पाहाते मी त्या मंद प्रकाशात
परत ........
आणि रोज ......
सर्व दालने बंद असतात मनाची
आणि अंधार होऊन मी पण बंद केलं असते स्वताला रात्रीच्या प्रहरात
पण मग तु पण ठरल्या प्रमाणे
संध्याकाळ होऊन येतो
आणि आशेचं जगण्यापुरता ईंधन पुरवून जातो
मग दिवसभर मनात पुरलेल्या इच्छांना उधाण येतो
स्वता:मध्येच उद्धवस्त अशा वेड्या रात्रीला
जगण्याचं बळ देऊन जातो.