STORYMIRROR

Yogesh Shinde

Inspirational

4  

Yogesh Shinde

Inspirational

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

1 min
443

चंद्रावर लोक चढले पण

अजूनही आमचे कवी चंद्रावर 

कविता लिहतात.


एखाद्या पुरस्कारासाठी 

आमचे लेखक

सत्ताधाऱ्याचे गुणगाण गातात.


ताटाखालचे मांजर होऊन

महान झाल्याचा अनुभव घेतात.

शेतकऱ्यांचा आसुड आता कोण

का ? ऊगारत नाही

सनातन्यांना तुकोबा होऊन

खुलेआम का झुगारत नाहीत.


खोट्याला खोटे म्हणावयची 

हिंमत आता हरली आहे का ?

मृगजळाच्या पाठीमागे लागत

उगाच कोरी पाने भरली आहेत का ?


स्वातंत्र्य स्वातंत्र्याची परिभाषा 

लोक विसरली आहेत का ?

फेकलेल्या टुकड्यावर

स्वातंत्र्य लिहून 

पोट भरू लागलीत का ?


प्रतिकांतीचं जगणं घोळक्याने

स्विकारू लागलीत का ?

 बापजाद्यांनी पेरलेली क्रांतीचे बिजे

आपल्या नाकर्तेपणामुळे कुजु लागलीत का ?


तसं असेल तर खरी चळवळ

आपल्याला कळली नाही

नुसत्या वळवळीने

इतिहासाने पाने भरली नाहीत

लक्ष देऊन ऐका बघा सुप्त आवाज येईल


वादळपुर्वीची शांतता महसुस होईल

पुन्हा क्रांतीचे ढोल नगारे वाजतील

पुन्हा कोंडलेली श्वास बोलतील

विद्रोहाचे कीर्र - तन होईल

अभंगाने शांतता भंगुन जाईल.


वारकऱ्यांचे वार होतील

आरपारची लढाई होईल

 जय पराजय जे होईल ते खुले आम होईल

 मातीत मिसळलेला शेवटचा रक्तांचा थेंब

फक्त आणि फक्त स्वातंत्र्याचीच

गाणी गाईल.


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

More marathi poem from Yogesh Shinde

Similar marathi poem from Inspirational