STORYMIRROR

Yogesh Shinde

Others

4  

Yogesh Shinde

Others

दगड

दगड

2 mins
636

काळा खिन्न ओबड-धोबड

मांजऱ्या पिटाळ्या 

ग्रेनाईट संगमरवरी 

मऊ मऊ झर,

जलजन्य अग्निजन्य 

रुपांतरीत खडक,


पिवळसर लालझर

पांढरा शुभ्र काळा खट्ट

तपकिरी लाल गुलाबी

हिरवागार राखाडी,

अगणित रंग.


पर्वत डोंगरी

नदीतील गोटे लांबलचक

दगडी खिळ

चौकोनी चिरा 

यांचा मुक मोर्चा निघला 

अन् स्वप्नात माझ्या आला.


मागण्या होत्या मोजक्या 

"इतिहास ऐतिहासिक" होता खुप.


गारगुटी वर आदळत गारगुटी

आमच्यात आमच्या लावला वाद,

घर्षणाने निघल्या ठिणग्या

तुझ्या साठी शोध लागला

आमच्यात माञ वाद पेटला,


"भावकितला हा ऐतिहासिक पहिला वाद"

मानवाच्या जगण्यासाठी सोसले

आम्ही आप्तीयांकडुनच कित्येक आघात,


आजकाल पडुन असतो खाच खळग्यात

डोंगराच्या अडवळणी भागात

अता उरलो आम्ही फक्त 

विज्ञानाच्या प्रयोगशाळेत,

इतिहासाच्या तासात.

 

हे बरोबर नाही केलस मानवा

आम्ही ठिणग्या उडवत संघर्ष केला

तुमच्यातही "भावकीचा वाद" होईल

तेंव्हा ठिणग्या उडवत मि ही हसुन घेईल.


काजवे चमकावे तसा जाळ झाला

जगण्यासाठी मानवाने खरच यांचा छळ केला ?


आमच्यावर दगड अन् दगडाचेच घाव

कोणी केला "सुरा" तर

 कोणी केला आमचा भाला,

आमचा वापर तर खुप 

भयानक केला,

जनांवरांना मारायचं, मांस खायचं

त्यांच्या रक्तात आम्ही न्हाऊन निघायचं.

तुझ्या स्वार्था साठी काय-काय करायचं.


गरज सरली तुझी अता,

लोखंडी दुनीयात तु 

आम्हाला विसरायचं.

तुझ्या अश्या वागण्याने लोखंडा सोबत

 आम्ही कायमचं वैर पत्करायचं.

आमच्या सानिध्यात आलं कि 

मग लोखंडाला आम्ही गंजुन सोडायचं.


छन्नी हातोडीचे घाव झेलत

मुळ आकार त्यागत

शेंदुर फासुन आम्ही देव झालो

कोणासाठी ?


चिरा चिरा जोडत गड किल्याचं

रूप घेत उंच,बुलंद, तटस्थ,अभेद्य उभा रहायचं.

वयानुसार झिजलो, थकलो, कधी हरलो कधी जिंकलो

कोणासाठी ? 

 

जंगलातले हत्ती, वाघ, इतर प्राणी 

आम्हाला तुडवायचे

राग यायचा त्यांचा,

कोरीव काम म्हणत तु 

त्यांचच रूप आम्हाला दिलंस,

असं जखमेवर मिठ चोळत,

तुला आज विचारतो असं का बरं केलस ?


घराचे मजल्यावर मजले

आम्ही रचायचे.

तुझ्या रक्षणासाठी आम्ही पहारे द्यायचे,

रंग लावुन तु आम्हाला लपवायचे.


काळ्या आईचे आम्ही लेकरे 

 उत्खननात आमच्या आईचं 

किती पोट फाडायचं ?

फक्त ऐतिहासिक ऐतिहासिक म्हणून किती 

दिवस मिरवायचं ?


कधी मुर्ती व्हायचे

कधी मुर्तीमंत व्हायचे

कधी मंदीर विहार

कधी चर्च मस्जीद व्हायचे

कधी चौक व्हायचे

तुमच्या सोयीनुसार

आम्ही जन्मो जन्मी तडे खायचे


गाडीला ऊटी द्यायचे

बांधावर उभे रहायचे

विहीरीचे कठडे व्हायचे

ताटाला टेकण म्हणून घ्यायचे

कधी खलबत्ता तर

कधी वरवंटा बनुन रहायचे


कवितेत शब्द म्हणून यायचे

गाण्यात बोल होऊन गुणगूणायचे.

शिव्या श्याप खात दगडा सारखं 

काळीज म्हणून ऐकायचे

शेवटी दगड म्हणत हिणवायचं.


सगळं सहन केलं मानवा

तुझ्या सोयी साठी,

अता नकोस करू पाप 

नको भडकाऊ माथी

नकोस भिरकाऊ कधी 

आम्हाला दंगलीसाठी 

आम्हाला दंगलीसाठी.


दगड बोलता बोलता मला 

शेवटी मानवाचा दगड पणा

उघडा करून गेला,

गाऱ्हाने ऐकता ऐकता माझाच दगड झाला.


Rate this content
Log in