सुगंध मनाचा
सुगंध मनाचा
सुगंध मनाचा
असा पसरला
आसमंत सारा
त्याने बहरला
मनाचा आनंद
क्षणात आला
हलके हलके
वृध्दिंगत झाला
जीवनात आला
हर्षाचा हा क्षण
आनंदे फुलते
सुगंधीत मन
नित्य दरवळो
किर्तीचा सुगंध
लाभो जीवनाला
शब्दांचा हा गंध
मनाचाच बंध
सुगंधीत श्वास
सदैव जीवनी
सुंदर आरास
