आठवणी
आठवणी
1 min
293
ते बालपण
रम्य आठवण
असे साठवण
मोहक क्षण
धुंद करती
त्या आठवणी
मनाच्या अंगणी
फेर धरती
कुणाची कधी
आठवण येते
भूतकाळी नेते
ती कधीमधी
मनाला कशा
येती क्षणोक्षणी
गोड आठवणी
निरंतरशा
धुंद ती प्रीत
आठवण एक
निरंतर नेक
मनात गीत
सांजसकाळी
आठवणी येती
दूर कशा नेती
निळ्या आभाळी
