* सत्य की स्वप्न *
* सत्य की स्वप्न *
तोच धुवांधार पाऊस तोच तू अन तीच मी ...
बेधुंद, बेभान, आसुसून बरसून दिलीस प्रेमाची हमी !
आकंठ प्रेमाचा आविष्कार पाहुनी मन भांबावले.. .
प्रणयात मश्गुल दोघे आपण....
सत्य की स्वप्न पाहिले !
अवखळ पावसाचा उन्मादच वेगळा,
सत्यामधे विश्व विसरले ....
अवचित स्वप्नी पाहिले तुला,घट्ट पकडले क्षण सारे !
प्रणयाचा उन्माद पाहून, हळुवार झाले मन, कंपित झाली काया...
परत फिरून येरे साजणा,
का रे पडली अघटित साया !