स्त्रीशक्ती
स्त्रीशक्ती
सौजन्याचा ओढून बुरखा, मोकर फिरताहेत भक्षक
नको बनू अबला आता, तूच हो तुझीच रक्षक
नको सांगू माते तिला, स्वप्नाळू परिकथा
ऐकव तिला शूर रणरागिनींच्या गाथा
ज्ञानाचा हो झरा , शिक्षणाची धरून कास
कुटुंबाचा हो आधार, जागू दे आत्मविश्वास
संकटी कुणी सापडता, आपल्यातील एक
सांग तिला तू नाही एकटी, तुझ्या पाठीशी अनेक
होउ दे आता नारीशक्तीचा जागर
तूच बन तुझाच आधार
