स्त्री
स्त्री
देवा सुंदर जगामध्ये केलीस एक किमया
घडविली अप्रतिम स्त्रीची माया
शृंगारात घडवलेस तिचे मोहक रूप
बहुरंगी-बहुअंगी असे तिचे स्वरूप
कोणी म्हणते काय अडते, नसेल जर का स्त्री संगती
अरे मूर्खां जरा विचार स्वतःला, आलास कसा ह्या जागती
हिंदवी स्वराज्याचे राजे शिवाजी जरी असले मोल
तरी आपण हे स्वप्न जगावे हेच होते जिजाऊंचे बोल
आजच्या जगात स्त्रीया जरी असल्या अग्रेसर करून दिरंगाई
पण त्यांच्या शिक्षणाचा पाया खरा रचला त्या थोर सावित्रीबाई
स्त्रिया आजच्या जगात खरंच दिसतात सर्व अग्रेसर
पण अजूनही आम्हास नाही कळली त्यांची कदर
सतत केली कुचंबणा, विटंबना अशा माऊलीशी
पदोपदी हेच विसरतो कि तीच आहे आपल्या सावलीशी
करू एक प्रण ह्या जगासमोर आज आपण
कुणी करणार नाही ज्याने दुखावेल तिचे मन
छळ, भांडण-तंटा आणि हुंडाबळी
गर्भात अली म्हणून घेतला तिचाच आम्ही बळी
जर का संपवून बसलो आज तिची माया
तर उद्या वंश चालवायला कोणास द्यावी काया
खरच देवा तुझे आहोत आम्ही ऋणी
आता नाही करणार, स्त्रीला दुखावणार कोणी
तिच्या सहवासात आम्हीही करू एकमेकांची प्रगती
देवा बरेच आहे उपकार अशी स्त्री ची महती
मानवेला साहय करू , ना करू कुठले दूषण
तुझ्याच गळ्यातील दोन ताईत बनू तुझे भूषण
