स्त्री - एक शोकांतिका
स्त्री - एक शोकांतिका
*~ स्त्री-एक शोकांतिका~*
ईश्वरा रे वीट आला नको आता ही मालिका।
त्रासदायक भूमिकेची ऐक तू शोकांतिका ।।
व्यक्त होते मी आता त्या तापत्या दुग्धापरी।
दाह होतो देह माझा,वाफ होते भावना।।
हरविले मागे मला मी,शोधिते मी मज आता।
मुक्त होण्या क्षणी,का गुप्त होतो आरसा?।।
रूप घेता मी जरा,जन्मते कटू टिकांची लेखणी।
धारदारी शब्द त्यांचे अन मी रिकामी पुस्तिका।।
बंदसे देऊळ मी अन वाळलेली मी नदी।
का स्वप्न दाखवून घात करते प्राक्तनाची रेषीका?।।
पण हे दैत्यांनो घ्या ऐकुनी तुम्हींही आता जरा।
प्रेम देण्या राधिका मी,वेळ येता कालिका।।
पण मानते ह्यास नशीब मी,हृदयास देते सांत्वना।
क्रूर गर्विष्ठी जगाची अखेरी मीच आहे नायिका।
क्रूर गर्विष्ठी जगाची अखेरी मीच आहे नायिका....!।।
