STORYMIRROR

Jyoti gosavi

Classics

3  

Jyoti gosavi

Classics

सप्तसूरांनी न्हाईले

सप्तसूरांनी न्हाईले

1 min
213


श्रीकृष्णाची ती बासुरी

 गेली आता दिगंतरा

 हरपले सप्तसूर

 दुःख झाले चराचरा 


स्वर नितांत कोमल

 गळ्यातच मखमल

 धागा सूटे हळुवार

 गीत जुळे अलवार 


वस्त्र स्वरांचे विणले

 देहभान हरपले

 प्रभू चरणी अर्पिले 

गीत लताने गायिले


 अंगाई चे सुर तीचे 

जणू दुधाची ती साय 

सर्वाच साठी गायिली

 झाली सर्वांची ती माय


 प्रीती गीतांची ती धुंदी 

दवातली  मुग्ध कळी

 अभिसारिका प्रेमी का

 होई प्रत्येकच बाळी


भक्ती गीते, शौर्यगीते 

तिचा वाटे अभिमान्

सूर लताचे ऐकता 

स्तब्ध होती ते जवान


 प्रत्येकच धाटणीचे

 गीत तिनेच गायले

 चिंब केले आम्हास

 सप्तसुरांनी न्हाईले 


 अमर झाली जगात

 विणा ती सरस्वतीची

 झाली अनंती विलीन

 गान कोकिळा देशाची



இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Classics