STORYMIRROR

Shila Ambhure

Classics

3  

Shila Ambhure

Classics

संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा

1 min
3.1K


सुधारक ,संत

झाले भूमित कैक

अवलिया एक

गाडगेबाबा.


जिल्हा अमरावती

जन्मभूमी असे शेनगाव

मुळ नाव

डेबुजी.


बाप झिंगराजी

सखुबाई होती आई

पत्नी कुंताबाई

तयांची.


जातिभेद अमान्य

आवडे भजन कीर्तन

साधेच वर्तन

बाबांचे.


पाहुनी अज्ञान

रमेना संसारात मन

झिजविले तन

सुधारापायी.


अंगावरी गोधडी

झाडू,गाडगे हातात

मुखाने गातात

उपदेश.


बघुनिया वेश

म्हणे कोणी गाडगेबाबा

पुकारे गोधडेबाबा

सामान्यजन.


कराया प्रबोधन

धरीली कीर्तनाची कास

भाषाही खास

सुबोध.


गोपाला गोपाला

देवकीनंदन हे गोपाला

होतसे भजनाला

सुरुवात.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics