संघर्ष
संघर्ष
संघर्षानेच माणूस शिकताे
स्वत:ला कणखर बनवताे
इतरांनाही प्रेरणा देताे
संघर्षच देताे नवी उमेद
जीवनाकडे पाहण्याची,
ताठपणे जगण्याची आगळी भेट
जीवनाच्या या वाटेवरती
संघर्ष असताे पावलाेपावली
कधी हार तर कधी जीत ठरलेली
नकाे थांबवू तू स्वत:ला,
घे उंच भरारी आणि गाठ
तुझ्या ध्येयाला...
