माणूस आणि पर्यावरण
माणूस आणि पर्यावरण
1 min
206
"झाडे लावा, झाडे जगवा " म्हणायला किती छान,
झाडे ताेडण्यात आता मात्र सर्वांचेच हरपलेत भान
वा छान ! फुले देतात सुगंध,
माणूस मात्र आपल्याच कृतीत दंग
विकास, विकास आणि विकास,
मग हाेऊ दे कितीही पर्यावरणाचा ऱ्हास
लाखाे झाडे क्षणात हाेतात नष्ट,
ह्यात माणूस मानतो स्वतःला सर्वश्रेष्ठ
अन् अभिमानाने सांगताे मी झाडे एवढी ताेडली,
मला नकाे आता ही पर्यावरणाची छडी
