STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Romance

4  

Sanjay Raghunath Sonawane

Romance

सखी-प्रेमगीत-संजय सोनवणे

सखी-प्रेमगीत-संजय सोनवणे

1 min
209

माझी प्रेमाची साऊली तू 

माझी आकाशातील चांदनी तू 

माझी रूपाची राणी ग तू 

माझ्या काळजाचा जीव तू  


   मन समुद्रासारखे विशाल 

   तुझे ह्रदय मन मोकळ 

   नाही पोटात कधी कपट 

   तुझे शब्द निष्कपट  


शीतल वाऱ्यात सोबत तू 

उन, पाऊसात सोबत तू 

खऱ्या विश्वासाची माया तू 

जीवलग सखी एकमेव तू  


तुझी वाणी खूप रसाळ 

त्यात शब्द अनमोल

साऱ्या दागिन्यात तू दागिना 

प्रेरणा मिळते तुझी जीवना  


साऱ्या नात्यांची तू जननी 

नारी सबला तू जीवनी 

तुझे कर्म खूप ग भारी

साऱ्या दुनियेत तुझी भरारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance