STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

श्री महालक्ष्मी प्रसन्न..!

श्री महालक्ष्मी प्रसन्न..!

1 min
32.4K


। श्री. महालक्ष्मी नमः।।


अमृताची गोडी तुझीया नावात

आलो मी आई तुझीया गावात। ।।धृ।।


हरी प्रिया तू माझे आई

जगदंबा तू अंबाबाई

तुझ्या कृपेचा महिमा

सारा गाव ग गायी............।।१।।


तुझ्या दर्शनानाने बाई

दुःख सारे दूर जाई

म्हणुनी दर्शनाची

होते भलती घाई.....।।२।।


सुकोमल लोचन

सदा हासरे तुझे

दैन्य क्षणात बाई

दूर सारते माझे....।।३।।


आशीर्वाद मागण्या मी

आलो तुझ्या दारी

जन्मभराची मज

आज दे ग शिदोरी.....।।४।।


कृपा होऊ दे ग आई

तुझ्या दरबारी

मी आलो बघ

तुझ्या दारी......।।५।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational