STORYMIRROR

Shobha Wagle

Romance

3  

Shobha Wagle

Romance

श्रावण महिना

श्रावण महिना

1 min
433

घननिळ्या श्रावणात

मन मोर आनंदतो

रिमझिम धारा अंगी

जीव खूप सुखावतो.


धरा नववधू भासे

शालू हिरवा नेसुनी

सुख मनाला मिळते

साज हिरवा पाहुनी.


खेळ ऊन पावसाचा

चाले वसुंधरेवर

सप्त रंगी ती कमान

दिसे छान नभावर.


श्रावणात सण सारे

आनंदाचे उत्साहाचे

जिव्हाळ्याचे एकोप्याचे

देती आनंद सौख्याचे.


सण मंगळा गौरीचा

येती लेक माहेराला

झिम्मा फुगडी घालण्या

रात्र सारी जागायाला.


व्रतवैकल्ये करती

पूजापाठ देवळात

शांत सुखद श्रावण

येतो एकदा वर्षात.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance