शोधत असतो
शोधत असतो
शोधत असतो नेहमी
गाव तो तू असल्याचा
जेवणाचं ताट समोर असतं
पण त्रास होतो तू नसल्याचा
तू असतेस जवळ रोज
व्हॉट्सअप वर मेसेज करतेस
स्वप्नं पडतात रोज तुझे
स्वप्नांत येऊन घास भरवतेस
तुझं असं कसं प्रेम सखे
अजून ही उमजलंच नाही
मनात भरते प्रेमाची जत्रा
पण मन माझं तुला कळलंच नाही
रोज रोज प्रपोज करतो
तरी नेहमी मला टाळतेस का
अजून किती दिवस वाट पाहू
अस उगाच मला जाळतेस का
खरं खरं सांग तू आता
काय आहे मनात तुझ्या
नको दाखवूस जगाला
पण एकदा सांग कानात माझ्या

