शोध माझा आयुष्याचा...
शोध माझा आयुष्याचा...
शोधात बुडाले आयुष्याच्या
क्षितीजापाशी बघत बसूनी |
नभात उडाले रंगीत पक्षी
मानस माझे ऊंच नेऊनी ||
आभाळाचे टोक गाठले
वर्चस्वाचे गर्व भासले |
आठवणींना चक्षू फुटले
विचार माझे बोलू लागले ||
नकोच गुंता नात्यांचा हा
नकोच प्रेम ते प्रलोभनाचे |
नकोच दुरावा जगातला या
एकटेच येणे न एकटेच जाणे ||
दुःखसागर चहूबाजूनी
केलेच दूर या कौस्तुभ मणीने |
सुखापलिकडील सुख देऊनी
मज मुक्त केले या जन्मातूनी ||