STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

शिलालेख प्रेमामधला

शिलालेख प्रेमामधला

1 min
233

आठवते मज रिमझिम रिमझिम  

  पावसातली भेट आपली

छणछण छणछण छणछण छणछण 

  पैंजण वाजे पायांमधली


दहा दिशांनी टपटप टपटप 

मुसळधार तो बरसत होता

मनात होई धडधड धडधड 

 तनात वणवा पेटत होता

 मना-मनांची तना-तनांची  

 भेट असे ती थेट आपली 


आठवते मज रिमझिम रिमझिम

 पावसातली भेट आपली

छणछण छणछण छणछण छणछण 

 पैंजण वाजे पायांमधली


वीज कडाडे लखलख लखलख 

 उजेड मधेच पाडत  जाई

उजेड पडता थरथर थरथर 

कापत सजणी लाजत  जाई

ओढा गातो खळखळ खळखळ 

खूप मजेने धून आपली


आठवते मज रिमझिम रिमझिम

 पावसातली भेट आपली

छणछण छणछण छणछण छणछण 

 पैंजण वाजे पायांमधली


ओठांस ओठ चुंबित होते  

 हातात हात गुंफले होते

थंड जलाच्या गारव्यातही  

 दोन देह ते पेटले होते

सरसर सरसर सरीवर सरी 

चिंब चिंब ती मिठी तापली  


 आठवते मज रिमझिम रिमझिम  

  पावसातली भेट आपली

छणछण छणछण छणछण छणछण 

  पैंजण वाजे पायांमधली


गार गार त्या गारव्यातला  

 प्रणय रंगला  रानामधला 

प्रेमकाव्य  हे  पावसातले  

 शिलालेख हा प्रेमामधला

नयन शराबी  ओठ गुलाबी 

मिठी तुझी गं स्वर्ग वाटली


आठवते मज रिमझिम रिमझिम  

  पावसातली भेट आपली

छणछण छणछण छणछण छणछण 

  पैंजण वाजे पायांमधली


झरझर झरझर धारा वाहे  

उष्ण जाहले श्वास आपले

थरथर थरथर कापे काया 

जेव्हा दोन्ही देह भेटले

विरह संपला  दोघांमधला 

संगम झाला प्रीती फुलली


आठवते मज रिमझिम रिमझिम  

  पावसातली भेट आपली

छणछण छणछण छणछण छणछण 

  पैंजण वाजे पायांमधली


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Romance