शहीद
शहीद
जगतो आम्ही भारत देशासाठी, सर्वस्व आमचे भूमातेसाठी,
जन्मदात्या आईच्या प्रेमाचे पाश नाही सोडवत,
तर भारतमाता आपल्या लेकरांच्या सुरक्षिततेसाठी आहे बोलावत,
धगधगत्या रक्ताचा अभिषेक करुनि सीमेवर मातृभमीचा होतो सन्मान,
थोड्याच वीरपुञांच्या नशीबात येते मृत्युपश्चात तिरंग्यात लपेटून जाण्याची शान,
देशाच्या रक्षणासाठी लावतात आपल्या प्राणांची बाजी, असे असतात हे निडर फौजी,
आमच्या जगण्याचा थाटच वेगळा, जिथे केला जातो शहीद जवानांच्या बलिदानाचा सोहळा,
छातीवर गोळ्या झेलून रचतात आपल्या भारतमातेचे आझादीचे गीत,
जिच्या कुशीत घेतला जन्म त्याच मातेच्या मायेच्या पदरावर कायमचे विसाव्या होतात शहीद।
