Aishwarya Asogekar

Others

3.8  

Aishwarya Asogekar

Others

जगू द्या

जगू द्या

1 min
170


जगू द्या हो जगू द्या, मला जगू पाहू द्या

मुलगी म्हणूनी आले जन्माला 

कोणत्या गुन्ह्याची शिक्षा मिळते मला? 

स्त्री म्हणजे दुर्गा, नारी शक्ती म्हणून संबोधतात मला

स्वतंत्रपणे गगनात भरारी घेऊ द्या

जगू द्या हो जगू द्या, 

मीच बनते भावाची लाडकी बहीण 

सर्वांना हवीहवीशी वाटणारी, 

बनते मी जबाबदार मुलगी

कुटुंबासाठी झटणारा, 

बनून कष्टाळू आई, घरात आणते सर्व सुखसोयी, 

जगण्याचा हक्क मला मिळू द्या, 

जगू द्या हो जगू द्या, 

माझ्यामुळे घराला येते घरपण 

सौख्य बरसते उजळते जीवन, 

वाढते माझ्यामुळे जगाची शान

उच्च कतबगारीने मिळवते मी सन्मान, 

स्वतःला सिद्ध करण्यास जीवनाचे प्रवेशद्वार खोलून द्या, 

जगू द्या हो जगू द्या, 

मला मारुन फायदा नाही

मारणे हा कायदा नाही, 

उद्याची झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला आजच जन्मू द्या, 

स्त्रीभ्रूणहत्या घडून अंधारलेल्या या जगात तिच्या अस्तित्वाची सोनेरी किरणे पसरु द्या, 

पण जगू द्या, जगू द्या, जगू द्या।। 


Rate this content
Log in

More marathi poem from Aishwarya Asogekar