STORYMIRROR

Madhura Kulkarni

Inspirational

4  

Madhura Kulkarni

Inspirational

शब्दांचा अबोल स्पर्श

शब्दांचा अबोल स्पर्श

1 min
66

कधी मायेची हळूवार फुंकर

कधी अंगावर येई शहारा

मन हरखून टाके आनंदाने

शब्दांच्या अबोल स्पर्शाचा खेळ सारा


अबोल जरी असला

तरी बोलून जाई बरेच काहीतरी

नाती जोडणारा दुवा असे

कधी हाच उसवून टाके नात्यांची वीण सारी


हा स्पर्श प्रत्येकाला हवाहवासा

दुसऱ्याला द्यावासा वाटतो

कधी मृदू , कधी कठोर

क्षणात कोणाच्या जगण्याचा आधार बनून जातो


छेडीतो तारा मनाच्या

दिवसाची सरगम कधी बदलून जातो

अबोल स्पर्शाचा अचूक अर्थ उमगता,

आयुष्य जगण्याचे गणित उलगडून देतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational