पहाटसोहळा
पहाटसोहळा
1 min
18
चंद्रकोर मंदावली नभि
दवबींदुने पाने ओलेती झाली
भेटाया रविराजला आता, तिष्ठली अवनी सारि
तरल वाहे पहाटवारा,
साद घालित वृक्षवल्लिंना
अलवारपणे जागवून मंत्रमुग्ध करतो आसमंताला
उधळण झाली गुलाल केशराची
रविराज आले उदयाला
रोमांचित करूनी अवनीला
रंगतो नित्याचा असा पहाटसोहळा
