शब्द
शब्द
शब्दांना जेव्हा कंठ फुटता
पाझरती साचलेल्या भावना
अंत नसलेल्या नद्या जणू
ओथंबून वाहती सारे अणू
शब्द जेव्हा लाडिक रंगती
नाजुक लाली गाली चढती
लाजेचा ओढून शेला मखमाली
वाढवी क्षणात रंगत न्यारी
शब्द रुसती, कोणा रागावती
होत्याचे नव्हते त्वरित करीती
चेहर्यावरची मात्र ही लाली
तामसी असा भाव दर्शवती
शब्द होती निःशब्द जेव्हा
माहोल करी स्तब्ध सारा
ह्रुदयाचे ठोके वाढवी टोला
डोळ्यात साठवी प्राण नजरा
शब्द जेव्हा स्वतःशीच खेळत
हास्याचे अलगद तुषार पसरत
हळूवार करी क्षण हलकेच
निरागस विनोदाचे क्षण सर्वत्रच
शब्दांचा हा तरल ठेवा
आयुष्य सरत असल्याचा हेवा
आठवणी राहती, मनात स्मरती
अनुभवांचे अमुल्य संचित गाठीशी
