आठवणीतली पाखरे
आठवणीतली पाखरे
1 min
232
इवल्या पावलांनी, सरल्या त्या वाटा
सुदृढ पावले, मग चालती त्याच वाटा
पाटीवरले धडे गिरवत, आयुष्याचे अर्थ शिकवत
चिमुकली मने घडवत, वडीलधारी म्हणून घेत
शाळेतली पाखरे जमली असता वाॅट्सअॅपच्या कट्ट्यावर
वाटा निसटल्या जुन्या वळणांवर
छंद नवे, गंध नवे
ठेवणीतल्या आठवणींचे, सुवास दरवळले
कुणाच्या हास्याचे तुषार, तर कुणाच्या दुःखाचे क्षार
सारेच या कट्ट्यावर, मांडले त्यातूनच सप्तरंगी कारंजे फुलले
