शब्द (मुक्तछंद)
शब्द (मुक्तछंद)
मला बोलायची कसलीच घाई नाही
कारण माझा शब्द यथावकाश
पोहचणारच आहे तुमच्या पर्यंत
या ना त्या वळणापाशी...!
अतीव आनंदाच्या, अतीव दु:खाच्या
अतीव निराशेच्या, अतीव रागाच्या
अतीव करुणेच्या, अतीव प्रेमाच्या...
...किंबहुना कुठल्याही आत्यंतिक
भावनेच्या चाळणीतून खालपर्यंत
उतरलेला तुमचा शब्द...
...खरंतर माझाच असेल!!
