सावरकर
सावरकर
सावरकर
स्वातंत्र्य देशास
मुक्ती बांधवास
जोडूया कर ...
कर्तव्यातही
बाणाच करारी
घेतली भरारी
समुद्रातही ...
तळमळीने
स्वदेश जपला
मान सांभाळला
कळकळीने ...
जातीयवाद
तोडले बंधन
पतित पावन
मंदिरा साद ...
किती सोसले
शिक्षा काळेपाणी
इंग्रजांची वाणी
भोग भोगले ...
स्वप्न मनात
अखंड भारत
ठेवली तेवत
ज्योत जनात ...
तव संसार
झाली जरी होळी
रिकामीच झोळी
घेतला भार ...
नेता शक्तीचा
देशास लाभला
मनात जपला
भाव भक्तीचा ...
