STORYMIRROR

Gaurav Mane

Tragedy

2  

Gaurav Mane

Tragedy

सांगा ना आयुष्य इतकंस असतं का ?

सांगा ना आयुष्य इतकंस असतं का ?

1 min
66

आईवडिलांच्या ऋणांची हीच 

परतफेड असते का?

नकळत पुरवलेल्या प्रेमाची 

हीच आठवण असते का?

सांगा ना आयुष्य इतकंस असतं का?


क्षणिक दुःखात बुडून जातांना 

आयुष्य सपवणं हेच option असतं का?

मिळालेल्या अनुभवांची शिदोरी

इतक्यालवकर संपते का?

सांगा ना आयुष्य इतकंस असतं का ?


थोडा काळ बदलला म्हणून 

आयुष्य संपत का ?

पुन्हा एकदा हृदयाजवळ हात ठेवून All is well

म्हणणं एवढं कठीण असतं का ?

सांगा ना आयुष्य इतकंस असतं का ?


समाजाने हिनवलं म्हणून 

चारित्र्याला दाग लागतो का ?

आपण गेलो म्हणजे 

तो दाग मिटला जातो का ?

सांगा ना आयुष्य इतकंस असतं का ?


घराची पायरी ओलांडताना ठरवलेल्या 

तत्वांशी तडजोड करन खरंच सोपं असतं का ?

केलेल्या प्रयत्नांना आठवून परत 

एकदा try करणं एवढं अवघड असतं का ?

सांगा ना आयुष्य इतकंस असतं का ?


आईवडिलांच्या प्रतिक्रियांपेक्षा इतरांच्या

प्रतिक्रिया इतक्या महत्वाच्या असतात का ?

त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे 

मागणारे आपल्यासाठी खरंच गरजेचे असतात का ?

सांगा ना आयुष्य इतकंस असतं का ?


सांगा ना आयुष्य इतकंस असतं का ?

सांगा ना आयुष्य इतकंस असतं का ? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy