STORYMIRROR

Mahananda Bagewadi

Romance

3  

Mahananda Bagewadi

Romance

सांग सखे.....

सांग सखे.....

1 min
422

या शुभ रात्र चांदणी

चमकतो काजवा,

सखे मला भेटायला 

तुला वेळ का हवा????

या चांदण्या रातीत सजने,

हाती तुझा हात हवा,

सांग सखे मला भेटायला 

तुला वेळ का हवा????

वसंत ही बहरला नाही अजूनी

मयुरा नाचे का तू वनी,

दुःख दडवूनी माझ्या मनी,

चेहर्‍यावर सुखाचाच गारवा,

सांग सखे मला भेटायला 

तुला वेळ का हवा????

हृदयात होती तीव्र वेदना,

झाले रिते प्रेम तुझ्या मना,

चल करु सुरु हे प्रेम,

पुन्हा एकदा नवा,

सांग सखे मला भेटायला

तुला वेळ का हवा?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance