- साल सरता सरता
- साल सरता सरता
सरत्या वर्षाच्या अनुभूतीने
बदलून गेले जग
काळ्याकुट्ट मेघांनी जणू
दाटलेले नभ
काळाने घेतली
सर्वांचीच परीक्षा
चाकोरीबद्ध आयुष्याच्या
पालटल्या दिशा
नैराश्याच्या खोल गर्तेत
खात होते सर्व खस्ता
अंधारलेल्या जगात
सापडत नव्हता रस्ता
संकटांवर ज्यांनी
नेटाने केली मात
त्यांचीच किनार्यावर
पोहोचली नाव
शिकवून गेले हे वर्ष
जीवनाचे सार
पैशापेक्षा महत्वाची
माणुसकी फार
