STORYMIRROR

Akhil Khaire

Romance

3  

Akhil Khaire

Romance

साजनी

साजनी

1 min
238

साजनी मनं झुरतंय गं,

साजनी मनं छळतंय गं !

तुझ्या प्रितीच्या झुंजीत,

मनं हरलंय गं !!


घात झाला माझा राणी, तुझ्या नैनी बाणाने,

पडलं ह्रदय निपचीत, तुझ्या देहबोलीने !

साजनी मन तळमळते गं,

तुझ्या जीवात जीव माझा गुंतलाय गं !!


रूप गोजिरं हे तुझं, मनात ठसलंय कसं..?

कोवळ्या फुलावर जणु, बसलं फुलपाखरू जसं!

साजनी मन फसलंय गं,

तुझ्या गोडगुलाबी हसण्यात रमलंय गं !!


व्यथा माझ्या मनाची सांग, सांगु कुणाला,

जखमा दिल्या तु अश्या, त्रास होतो जिवाला !

साजनी मला कळतंय गं,

तुझं मन हि माझ्या प्रेमात भुललंय गं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance