पाऊस आणि ती...
पाऊस आणि ती...
या पावसासारखाच तिचा स्वभाव होता !
कधी संथगार तर कधी मुसळधार होता..!!
संथगारात ती प्रेमळ, रूपेरी असायची,
मुसळधारेत निव्वळ भांडायची !!
एकदा अशीच मुसळधार ओसरली,
हे नाही करायचं, ते नाही करायचं,
याच्याशी नाही बोलायचं,
त्याच्यासोबत नाही राहायचं,
असं नाही कि तसं नाही,
माझा बाप होऊन रागवायचं...!
तो मुसळधार नकोसा झाला एकदा मला,
मग मी हि ढग होऊन एकदा गडगडाडलो,
पेटुन उठलो तडफडणाऱ्या वीजेसारखा,
सांगितलं तु प्रेयसी आहेस, तु संथगारच रहा,
ढगांवरील आभाळ तु काही बनु नकोस...!
तेव्हा तिचा अहंकार धो-धो बरसला,
न् मुसळधार पाऊस दुसऱ्या गावी परतला,
येईल तो परत पुढच्या नक्षत्राला,
येतांना मात्र नको तो मुसळधार होऊन नातं तोडणारा,
तर हवा तो संथगार येऊन या
ढगाशी पावसाची नाळ जोडणारा ..!!!
