प्रेमात पडायचं हाय
प्रेमात पडायचं हाय
1 min
312
मनाला थोडं झुरायचं हाय,
आठवणीत त्याला रमायचं हाय !
स्वत:ला स्वत:शी गुंतवायचं हाय,
पुन्हा एकदा तुझ्या, प्रेमात पडायचं हाय !!
मनोसक्त त्याला बोलायचं हाय,
तुझ्या मनाशी हितगुज करायची हाय !
हाती हात घालुन चालायचं हाय,
तुझ्या नजरेत त्याला बुडायचं हाय !!
पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचं हाय...
परक्याला आपलं करायचं नाय,
तुझ्यातच जगणं बघायचं हाय !
काय गमवणं काय कमवणं हाय,
आयुष्य तुला सारं वाहायचं हाय !!
पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचं हाय...
