STORYMIRROR

Akhil Khaire

Others

4  

Akhil Khaire

Others

सांग तु माझी होशील का

सांग तु माझी होशील का

1 min
396

दिव्यातली वात, वातीतलं तेल,

अशी तु साथ देशील का...?

सांग तु माझी होशील का..??


दोन पावलं मी, दोन पावलं तु,

पुढे येऊन समजुतीने तु,

विचारांचा गुंता सोडवशील का..?

सांग तु माझी होशील का...??


पावसाच्या पहिल्या सरीने,

जशी थंड होते तप्त धरणी,

तुझ्या प्रेमाने असं तृप्त करशील का..?

सांग तु माझी होशील का..??


माझ्या दारिद्रयाच्या वादळात,

लाख जबाबदारीच्या गजरात,

आधार तु माझा होशील का..?

सांग तु माझी होशील का..??


मीठ-भाकरीच्या घासात, चुलीच्या त्या धुरात,

काटकसरीचं जीवन हे, तुंटपुंज्या पगारात !

गळणाऱ्या छतात, संसार तु हा निभवशील का.??

अगं सांग तु माझी होशील का...???


Rate this content
Log in