STORYMIRROR

Shashikala Gunjal

Romance

4  

Shashikala Gunjal

Romance

रुसवा

रुसवा

1 min
460

सोड रुसवा प्राण प्रिया रे

हा माझाच ध्यास आहे 

सर्वस्व वाहिले तुला मी

तू माझाच श्वास आहे


जपले फूल प्रेमाचे

हृदयी ताजेच आहे

देह असला माझा जरी

हा प्राण तुझाच आहे


तू चंद्र जरी माझा 

मी रोहिणी तुझीच आहे

बंदी ठेविले हृदयी तुला मी 

तू माझाच प्राण आहे


अश्रू दाटले बांध फुटले

तरी अश्रू तुझेच आहे

सर्वस्व वाहिले तुला मी

तू माझाच श्वास आहे


वाट पाहते प्राणसख्या रे 

सोड मनातला रुसवा

माझ्या मनातले प्रेम हे 

सारे तुझेच आहे


सोड आता बहाणे

तू सूर मी गाणे

असला मनी रुसवा तरी

हे गाणे तुझेच आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance