रस्ता
रस्ता
तू चालत राहा, माझ्याबरोबर,
ध्येयामागून ध्येय गाठत तू राहा,
तू चालत राहा, मी असेन तुझ्याबरोबर
वाटेकरु भेटतील तुला अनेक,
बनतील काहीक जीवलग,
वाटतील जीवघेणे काहीक,
घुटमळू नको त्यांच्यात; ते चिन्ह असतील फक्त तुझ्या रस्त्यात
या चिन्हांचा मागोवा तू घे,
कोठून जायचे, कसे जायचे याचा निर्णय तूच घे,
अडखळशील, पडशील, वाट तू चुकशील,
पण शिकशील, शहाणी तू होशील
अनंतापासून अनंतापर्यंत प्रवास हा तुझा,
सुरूवातही मी आणि शेवटही मीच तुझा,
इतकेच काय रस्ताही मीच तुझा,
या रस्त्यांवर प्रत्येक पाऊल आनंद देवो तुला हाच ध्यास माझा
तू चालत राहा, माझ्याबरोबर,
तुझ्याकडून माझ्याकडे येत तू राहा
तू चालत राहा, मी आहे तुझ्याबरोबर