तुझं माझ्याबरोबर असणं
तुझं माझ्याबरोबर असणं


तुझं माझ्याबरोबर असणं सूर्यासारखं आहे,
कधी सकाळच्या कोवळ्या किरणांसारखं;
जीवनावश्यक सत्व देणारं,
कधी कडाक्याच्या थंडीतल्या उन्हासारखं;
मायेची ऊब देणारं,
कधी रखरखत्या दुपारच्या चटक्यांसारखं;
पितृप्रेमाने शिस्तीचे धडे देणारं,
आणि कधी काळोख्या रात्री चंद्राच्या प्रकाशासारखं;
जिवलग मित्राप्रमाणे, काळोख असो वा उजेड,
दुःख असो वा आनंद, दृश्य असो वा अदृश्य,
नातं जे सदा साथ देणारं...