मी आणि माझा एकांत
मी आणि माझा एकांत
1 min
416
मला खुप काही सांगायचे आहे,
घुसमटलेला श्र्वास मोकळा करायचा आहे.
माझ्या मनात उफळलेले वादळ कोण शांत करील ?,
माझी अनफिल्टर गोष्ट कोण ऐकून घेईल ?.
जगापासून मी लपवलेली माझी प्रतिमा,
दाखवेल का कोणी त्याच्या नयनांत ?.
किस्से कडू गोड अंतःकरणी पुष्कळ जमा,
ते ऐकण्यास , कोणी शोधेल का मला माझ्या एकांतात ?.
मी वाट त्याची आजवर पाहते,
तोवर मी स्वतःतच रमते.
तुला सांगण्याच्या गोष्टी सध्या ठेवले आहेत गाठोड्यात,
मी आणि माझा एंकात शिकतो आहोत जीवन तुझ्याविना जगण्यात.
