STORYMIRROR

Archana Murugkar

Abstract

3  

Archana Murugkar

Abstract

रंगारंग दुनिया

रंगारंग दुनिया

1 min
202

जाता रंगात रंगूनी

मन जाई गुंगूनी

जत्रेमध्ये खेळण्यात

मूल जाई हरवूनी


येतो प्रकाशाचा रथ

घोड्यावर सातरंगी

डोळे दाखवती सारे

सृष्टीतले रंग जगी


रंग निळा नभाचा

पित असे उर्जेचा

रंग तांबडा प्रेमाचा

असे हरित सृष्टीचा


खरा निसर्ग रंगारी

नाना ऋतू नाना छटा

रंग दावे दिनभर

मनोहारी रंगछटा


कधी सुख कधी दु:ख

रंग दावती भावना

साऱ्या रंगांचे महत्व

असे मनुष्य जीवना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract