STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Romance

4  

Priyanka Shinde Jagtap

Romance

रंग प्रेमाचा का असावा हंगामी?

रंग प्रेमाचा का असावा हंगामी?

1 min
431


रंग प्रेमाचा

का असावा हंगामी?

मिळावी हमी

कायमची...


कृतीतून प्रेम

झळकावे ते मनोमनी,

ओघळावे लोचनी

हळूवार...


राग, घृणा

नको तयांची संगती,

साधते अधोगती

त्यांच्यासवे...


जगायचे एकदा

मुक्त जगू द्यायचे,

नात्यांना जपायचे

हृदयात...


शुद्ध विचारधारा

सात्विक असावे आचरण,

द्वेषाचे कुंपण

तोडावे...


जिंकावे प्रेमाने

शत्रुलाही लाज यावी,

मुक्त उधळावी

स्तुतिसुमने...


प्रेमाचा भुकेला

त्याला प्रेम वाढा,

अहंकारी तिढा

उपटावा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance