रम्य ते बालपण
रम्य ते बालपण


ठेवा असे आनंदाचा
काळ हा बालपणाचा
सर्वांच्या आठवणीचा
अंतरी जपावयाचा।१।
नाही चिंता नाही भीती
सारे लाड पुरे होती
गाणी, गोष्टी ऐकवती
जो हवा तो खाऊ देती।२।
सानुले घरटे असे
आई, बाबा विश्व असे
कशाचीही वाण नसे
स्वर्ग तेथे फिका दिसे।३।
ज्ञान सहज मिळते
मूल्यांचे रोपण होते
संस्कारबीज रूजते
विकासा मदत होते।४।
जीवन पाया घडतो
आनंदे खेळ खेळतो
गाणे गाऊनी नाचतो
हळूहळू मोठे होतो।५।