STORYMIRROR

Pratibha Chandurkar

Abstract

3  

Pratibha Chandurkar

Abstract

रम्य छटा...

रम्य छटा...

1 min
149

पूर्वसमुद्री छटा पसरली

रम्य सुवर्णाची !

कुणी उधळिली मूठ नभी

ही लाल गुलालाची?

सजला मग लाल रक्तीमा

तिच्याच गालावरती !

पाहून लीला, तो ही हसला

निसर्ग फुले सभोवती...

येता अवचित गाज कानी

धरती सजे सुरांनी !

मंजुळ, सुरेल शब्दांची

माळ जणू अवतरली..

कोण असे चित्रकार हा

सजवाया ही अवनी !

विविध रंग घेऊनी

रंगवली ही नक्षी...

नाव विधाता आहे त्याचे

रूप ही असे साजिरे !

तुम्हां आम्हांच्या मनी

निरंतर जे ठसले...


Rate this content
Log in

More marathi poem from Pratibha Chandurkar

Similar marathi poem from Abstract