रक्षासूत्र....
रक्षासूत्र....
राखी पौर्णिमा सण आनंदाचा
सानुली बांधी राखी भाऊराया
लाडी-गोडी कधी थट्टा थोडी
भेट भावाकडून आज सावराया
बंध सजले आज रक्षणाचे
माया-ममतेत नाते ओथंबलेले
आभाळमाया माझा भाऊ पाठीराखा
आजीवन एकमेकावरी विसंबलेले
रक्षासूत्राची पूर्तता करी भाऊराया
अमोलिक नाते जीवेभावे जपूनीया
मनगटी राखी सजली भावाच्या
आदरार्थी माया भाव अर्पूनीया
