रिमझिम रिमझिम ओला श्रावण
रिमझिम रिमझिम ओला श्रावण


नाजूक साजरे थेंब टपोरे
हिरव्या रानी, डोळे फुलवूनी
फुले हासती, रंग खुलवूनी
उघडझाप कधी कधी पंख पसरूनी
अवखळ वारा मंद शहारा
अवचित येता या जलधारा
मनी फुलावा, मोर-पिसारा
धुंद क्षणांचा, मुग्ध सहारा...
हर्षित, गंधित चिंब तन-मन
रिमझिम रिमझिम ओला श्रावण...!
हरितगिरीवरी उभ्या आडव्या शुभ्रकडा
फेसाळ सरीता प्राजक्ताचा पाडी सडा
गडद जलद वा फिकट रेशमी
चित्राकृती या नभो अंगणी
जलात कोरीत अवघड नक्षी
आकाशी विहरे स्वच्छंद विहंगी
शिल्पित, कल्पित रोमरोमी स्पंदन
रिमझिम रिमझिम ओला श्रावण...!